MovieMate Media

"नेक्स्ट स्टेप" च्या वेबमिनारमधून सुप्रसिद्ध मान्यवर मंडळीचे नवोदित कलाकारांना मार्गदर्शन

28 May 2020 | Movie Mate Media

दरवर्षी अनेक नवीन अभिनेते अभिनेत्री टेलिव्हिजन आणि सिनेमाक्षेत्रात प्रवेश करत असतात. यातील बऱ्याच जणांना या क्षेत्राचा काहीच अनुभव नसतो... अगदी शूटिंग कसं होतं हे सुद्धा माहित नसतं, त्यामुळे सेटवर थोडंसं गोंधळायला होतं सुरवातीला... या क्षेत्रात येण्यासाठी खूप लोकांची धडपड चालू असते. अगदी पोर्टफ़ोलिओ बनवून सगळ्या निर्मितीसंस्थाच्या ऑफिसचे उंबरे सुद्धा झिझवावे लागतात. अनेकवेळा ऑडिशन देवून सुद्धा यश येत नाही... काम मिळालं तर सेटवर काय करायचं, कसं वागायचं कळत नाही.. फिल्म शूटिंगची तर वेगळीच भानगड असते, डेलीसोपच्या वेगाशी जुळवून घेताना नाकी नऊ येतात...  अभिनय तर येतोय पण आता प्रत्यक्षात रणांगणात उतरल्यावर नक्की काय करायचं? मोबाईल कॅमेरा आणि फिल्म कॅमेरा यात फरक असतो?या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल जाणून घेऊया, या क्षेत्रातल्या जाणत्या, अनुभवी दिग्गजांकडून.......  जयंत पवार आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मीडिया  प्रा.लि. ने "नेक्स्ट स्टेप" या अनोख्या उपक्रमाअंतर्गत एका वेबमिनारचे आयोजन केले असून  ३१ मे  ते ६ जून या कालावधीत या वेबमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.या वेबमिनार मध्ये अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओक, कॅमेरामन वासुदेव राणे,दिग्दर्शक, निर्माते मंदार देवस्थळी, दिग्दर्शक गिरीश  मोहिते, अभिनेते आणि उत्तम डबिंग आर्टिस्ट उदय  सबनीस, व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार,कास्टिंग दिग्दर्शक रोहन मापुस्कर असे अनेक मान्यवर या वेबमिनार मध्ये मार्गदर्शन करणार आहेत.स्वरूप रिक्रिएशन्स अँड मीडिया  प्रा.लि. ने आजवर अनेक मराठी चित्रपटांची, नाटकांची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे.  वेबमिनारच्या अधिक माहितीसाठी ९००४७८८५७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Share :