MovieMate Media
सुश्रुत भागवत यांचा 'भिडे इन बँकॉक'

सुश्रुत भागवत यांचा 'भिडे इन बँकॉक'

23 Feb 2020
 

"पेईंग घोस्ट", "मुंबई टाईम", "असेही एकदा व्हावे" असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केलेले सुश्रुत भागवत आता नव्या चित्रपटाच्या तयारीला लागले असून "भिडे इन बँकॉक" असे या चित्रपटाचे नाव आहे.   उदाहरणार्थ निर्मित, विकास हांडे आणि लोकेश मांगडे हे  "भिडे इन बँकॉक" ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.उदाहरणार्थ निर्मित ह्यांची निर्मिती केलेल्या "कागर" ह्या चित्रपटला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. "भिडे इन बँकॉक" या चित्रपटाची कथा-पटकथा शर्वाणी-सुश्रुत यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शन सुश्रुत भागवत यांचे आहे. मध्यमवर्गीय, पापभिरू भूषण भिडे ह्यां पात्राभोवती चित्रपटाची कथा केंद्रित असणार आहे.   सुश्रुत भागवत यांनी आतापर्यंत केलेले तीन चित्रपट एकमेकांपेक्षा वेगळे होते. हे वेगळेपण कायम जपत "भिडे इन बँकॉक" या चित्रपटातूनही सुश्रुत मजेशीरपणे कथा मांडणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून चित्रपटात कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. यावर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 
Share :