MovieMate Media
२ फेब्रुवारीला रंगणार पं. भीमसेन जोशी स्मृती संगीत समारोह

२ फेब्रुवारीला रंगणार पं. भीमसेन जोशी स्मृती संगीत समारोह

22 Jan 2020

पं. शौनक अभिषेकी, गायिका विभा नायक या मान्यवर कलाकारांना ऐकण्याची संधी*  जीएसबी सभा मुलुंड या संस्थेनं मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २ फेब्रुवारीला संध्या. ५.३० वाजता भीमसेन जोशी स्मृती संगीत समारोह आयोजित केला आहे. मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांना ऐकण्याची संधी संगीतप्रेमींना मिळणार आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने विविध क्षेत्रामध्ये जीएसबी सभा, मुलुंड  ही संस्था मोठ्या प्रमाणात कार्यशील आहे.  ज्येष्ठ तबलावादक पं. रवींद्र यावगल यांना या समारोहामध्ये पं. भीमसेन जोशी स्मृती संगीत पुरस्कार २०२० प्रदान करण्यात येणार आहे. तर गायक पं. शौनक अभिषेकी, गायिका विभा नायक, हार्मोनियमवादक उदय कुलकर्णी आणि श्रीधर भट, तबला वादक पं. सुभाष कामत आणि विघ्नेश प्रभू, मंजिरावादक सिद्धार्थ मेस्ता, पखवाजवादक ओमकार दळवी यांचे सादरीकरण होणार आहे. मिलिंद कुलकर्णी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत.   या कार्यक्रमाचे आयोजक श्री. विश्वनाथ भट, सचिव श्री गणेश राव,पदाधिकारी श्री बी एस. बलिगा यांनी स्मृती संगीत समारोहाद्वारे संगीतप्रेमींना दर्जेदार गायन-वादनाची मेजवानी अनुभवायला मिळणार असल्याचे आवर्जून नमूद केले आहे.  सदर कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य प्रवेशिका महाराष्ट्र सेवा संघ,मुलुंड येथील कार्यालयात उपलब्ब्ध असून अधिक माहितीसाठी ९५९४९४२१३८ या  क्रमांकावर संपर्क साधावा

Share :