MovieMate Media

"व्हायरस मराठी"चा लॉक डाउन फिल्म फेस्टिव्हल

29 Apr 2020 | Movie Mate Media

*परीक्षक म्हणून लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री  सोनाली कुलकर्णी , दिग्दर्शक  संतोष कोल्हे आणि  दिग्दर्शक समीर पाटील हे काम पाहणार*   लॉक डाउनच्या काळात तुमची सगळी क्रिएटिव्हिटी पणाला लावून तुम्ही उत्तम  शॉर्ट फिल्म अथवा   डॉक्युमेंटरी बनवली आहे का? नसेल बनवली तर लगेच तयारीला लागा  आणि  लवकरात लवकर तुमच्या फिल्म्स व्हायरस मराठीला  पाठवा.  या काळात खूप तरुण फिल्म मेकर्स वेगळा विचार करून चांगल्या फिल्म्स बनवत आहेत त्यांच्यासाठी आणि या वेळाचा चांगला उपयोग करत काही जण अगदी मोबाईलवर सुद्धा चांगले माहितीपट आणि शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत, त्यांच्यासाठी "व्हायरस मराठी"ने हा उपक्रम आखला आहे.  या आगळ्या वेगळ्या डिजिटल फिल्म फेस्टिव्हल मध्ये , शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी दोन्ही विभागात प्रत्येकी तीन पारितोषिकं दिली जाणार आहेत ,प्रथम पारितोषिक - 7500/-  द्वितीय पारितोषिक- 5000/- आणि तृतीय पारितोषिक- 3000/- आहे.  या लोक डाउन फिल्म फेस्टिव्हलचे परीक्षक म्हणून  लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री   सोनाली कुलकर्णी ,   दिग्दर्शक  संतोष कोल्हे आणि   दिग्दर्शक समीर पाटील हे काम पाहणार आहेत.   निवड केलेल्या सर्वोत्कृष्ट दहा फिल्म्स Virus मराठीच्या YouTube चॅनेल वर प्रदर्शित केल्या जातील. आणि सर्व पुरस्कार विजेत्या फिल्म मेकर्स ना लॉक डाउन नंतर व्हायरस मराठी सोबत काम करायची संधी मिळणार आहे.   फिल्म लॉक डाउन चे सगळे नियम पाळून शूट केलेली असावी, टेक्निकल स्पेसिफिकेशन ची चिंता नाही, मोबाईलवर शूट केलेली असली तरी चालेल पण क्वालिटी उत्तम हवी.नीट एडिट केलेली असावी, अशी विनंती व्हायरस मराठी ने केली आहे. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या फिल्मस  ना विषयाचे बंधन नाही आणि  वेळेचंही बंधन नाही.या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी , एन्ट्री फॉर्म  व्हायरस मराठीच्या facebook page वर उपलब्ध आहेत.   तुमची  फिल्म  12 मे 2020 पर्यंत सबमिट करा , असे आवाहन ही  व्हायरस मराठीने केले आहे.  फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क-  आशुतोष- 9833077857 /  दिशा- 9867081530 Email-  vmffest@gmail.com

Share :